फलटण चौफेर दि २४
२५ ते ३० दरम्यान एप्रिल रोजी किरगीझस्थान देशाची राजधानी बिस्केक येथे होणाऱ्या ग्रँड पिक्स आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलींग स्पर्धेसाठी सुधीर पुंडेकर ९० किलो वजन गटांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.मागील वर्षी जुन २०२३ रोजी "पर्ल ऑफ किरगीझस्थान"- आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सव - २०२३,इस्सिक-कुल प्रदेश, किरगिस्तान येथे आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत पै.सुधीर पुंडेकर ८०अधिक वजन गटात भारतासाठी कास्यपदक जिंकले आहे.
एप्रिल २०२२ रोजी बिस्केक,किर्गिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुधीर पुंडेकर यांने ९०किलो वजन गटात भारत देशाला कांस्यपदकची कमाई करून दिली व १६ मे २०२२ रोजी ओश,किर्गिस्तान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर राहिला.
मुळीकवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सुधीर पुंडेकर ने सात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे. २०१७ आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.
आंतरराष्ट्रीय कामगिरी
•जागतीक क्रमवारी मध्ये ५ व्या स्थानावर
• तुर्कमेनीस्थानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे
प्रतिनिधीत्व
•युनायटेड वर्ल्ड रेसलिंग - सीनियर बेल्ट रेसलिंग अलिश ग्रँड प्रिक्स २०२२, बिश्केक, किर्गिस्तान
कांस्यपदक
•Uww एशियन चॅम्पियनशिप ओश,
२०२२ किर्गिस्तान सहभाग
• दक्षिण कोरियात झालेल्या वर्ल्ड मार्शल आर्ट मास्टरशिप
गेम्स स्पर्धेत सहभाग
• बेल्ट रेसलिंग वर्ल्ड कप बेलारूस २०१६
• हंगेरी (बुडापेस्ट) येथे झालेल्या वर्ल्ड स्पोर्ट्स केम्पो २०१९ स्पर्धेत सुवर्णपदक,रौप्यपदक
• बेलारूस येथील वर्ल्ड पॅक्रीशन चॅम्पियनशिपमध्ये २०१८ कांस्यपदक
. आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलींग कुस्ती स्पर्धा अझरबैजान
कांस्यपदक
. ग्रँड पिक्स इंटरनॅशनल बेल्ट रेसलिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०२३ सहभाग
. एशियन चॅम्पियनशिप जिजाक, उजबेकीस्थान २०२३
९०किलो सहभाग
."पर्ल ऑफ किरगीझस्थान"- आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सव - २०२३,इस्सिक-कुल प्रदेश, किरगिस्तान
८० अधिक कांस्यपदक
. आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलींग स्पर्धा उजबेकीसथान
सप्टेंबर २०२३ -९० kg सहभाग
भारतामध्ये नवख्या बेल्ट रेसलींग या कुस्ती प्रकारात तो आपल नशीब अजमावून पहात आहे, सुधीर खेळत असलेल्या बेल्ट रेसलींग या कुस्ती प्रकाराला Uww 'जागतीक कुस्ती संघटनेची" व "ऑलम्पिक कांउसीयल ऑफ एशिया' ची मान्यता आहे.
आर्थीक अडचण असतानाही तो खचून न जाता एका ग्रामीन भागात राहुन तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत असतो, आलेल्या आडचनींच भाडवल न करता त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने यशप्राप्ती मिळवली आहे.
दररोज ५०० जोर, ५०० सपाचा, लॉग रन, हील रन, बेल्ट रेसलींगचा सराव, टायर ओडने, कप्पीच्या साह्याने जड वजन ओढून, दोर चडने आशा प्रकारे जुने व्यायाम प्रकार करत आहे, उराशी बाळगलेल स्वप्न सत्यात उतरवन्यासाठी तो रोज स्वताच्या श्री शिव समर्थ क्रीडा संकुल मैदानावर घाम गाळत आहे,
एक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार कारन्यासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते कोट्यवधी रुपयांचा खर्च कराव लागतो तेव्हा आंतराष्ट्रीय खेळाडू तयार होतात पन आपल्याला या सुविधा उपलब्ध झाल्या नाही म्हनुनखचुन न जाता मीळेलत्या खुराकावर व खडतर सरावातुन आगामी थायलंड येथे होणाऱ्या इनडोअर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकन्याच स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करत आहे
सुधीरचे राम जन्मभूमी न्यास अयोध्या अध्यक्ष गोंवीद देवगिरी स्वामी,उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,माढा लोकसभा खासदार रंजीतदादा नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मुक्तार तांबोळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.