फलटण चौफेर दि १७फलटण येथील गोरक्षक सौरभ सुनील सोनावले यांची महाराष्ट्र शासनाच्या मानद पशू कल्याण अधिकारी पदी निवड झाली असून नुकतेच त्यांना याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले आहे प्रमाणपत्रानुसार महाराष्ट्र शासनाचे पोलीस विभाग, महानगरपालिका नगरपालिका, अधिकारी पशु वधगृहाचे अधिकारी आणि इतर सर्व संबंधित विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचित करण्यात येते की मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी या समितीत प्रदान केलेल्या अधिकारानुसार सदरच्या मानद प्राणी कल्याण अधिकाऱ्यास , प्राणी कल्याण कायद्याचे सनियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आले असल्याचे म्हटले आहे