साखरवाडी गणेश पवार
पुणे सातारा व सोलापूर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या नीरा खोऱ्यातील धरणांची पाणी पातळी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच निम्म्यावर आली आहे गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असल्याने यावर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई समस्या भेडसावणार आहे एकूण ४८ टीएमसी क्षमता असणाऱ्या चारही धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १० टीएमसी पाणीसाठा कमी असून गतवर्षी ११ फेब्रुवारी रोजी चारही धरणात ३५ टीएमसी असणारा पाणीसाठा ११ फेब्रुवारी २४ रोजी मात्र २५ टीएमसी आहे
नीरा खोऱ्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत धरण क्षेत्र वगळता पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व सांगोला या तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे मात्र धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने
नीरा खोऱ्यातील भाटघर ,वीर, देवघर व गुंजवणी ही चारही धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली होती त्यामुळे पूर्व भागात पाऊस कमी पडून सुद्धा ऑगस्ट महिन्यापासून नीरा डावा व उजवा कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची टंचाई जाणवली नव्हती मात्र फेब्रुवारी ते मान्सूनच्या आगमनापर्यंत जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सिंचनासाठीच्या आवर्तनामध्ये बदल होणार असून ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना आडसाली ऊस व चारा पिके जगण्यासाठी कसरत करावी लागणार आहे
धरणांतील पाणी साठा
धरण पाणीसाठा २०२३ पाणीसाठा२०२४
भाटघर ७०.३५% ५६.३३%
देवघर ८१.३२% ४४.२४%
वीर। ६४.१६% ४९.८४%
गुंजवणी। ८३.३९% ७१.४९%