साखरवाडी (गणेश पवार)
फलटण तालुका खराडेवाडी येथे दिनांक 22 एप्रिल रोजी जय हनुमान नवतरुण मंडळ व शिवजन्मोत्सव समिती खराडेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपारिक पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून शिवजयंतीसाठी ची सर्व तयारी पूर्ण झाली असून दिनांक 22 एप्रिल रोजी किल्ले रायगड वरून शिवज्योत आणली जाणार असून दुपारी 3 वाजता शिवज्योतीचे पूजन होऊन ज्योतीची मिरवणूक विठ्ठल रुक्मिणी चौक खराडेवाडी येथून निघणार आहे 4.30 वाजता छत्रपती शिवरायांच्या पूर्ण कृती पुतळ्यास जल व दुग्धाभिषेक होणार असून सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पूजा करून मिरवणूकीला सुरूवात होणार असून गावातील सर्व महिला व ग्रामस्थ या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जय हनुमान नवतरुण मंडळ खराडेवाडी व शिवजन्मोत्सव समिती यांनी केली आहे.