साखरवाडी(गणेश पवार) बरड ता फलटण येथे महिला घरात एकटी असताना तिच्यावर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका तरुणाच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,मौजे बरड तालुका फलटण गावच्या हद्दीत दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला तिच्या घरी एकटी असताना तिचे गावाशेजारील राहनाऱ्या एका युवकाने अचानक फिर्यादीचे घरी पाठीमागून येऊन घराची कडी आतून लावून फिर्यादी महिलेचे तोंड दाबून तिला घरातील बेडवर झोपून तिचे इच्छेविरुद्ध जबरदस्ती करून तिच्याशी शारीरिक संबंध केले व घरातील कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली म्हणून फिर्यादीने आजपर्यंत भीतीपोटी तिचे पती यांना सांगितले नव्हते पतीशी चर्चा करून दिंनाक १७ रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी महिला तक्रार देण्यास आली असता याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनी भोसले करत असून सदर संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.