साखरवाडी गणेश पवार
आसू तालुका फलटण येथे विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आसिफ शेखलाल शेख वय 26, शेखलाल महबूब शेख वय 48 व लखन शेख सर्व रा तावडी ता फलटण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयतांची नावे असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि 20 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास संशयित यांनी फिर्यादीची मुलगी घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला असल्याचे व याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या चुलत भाऊ निजाम यांच्यासोबत शेखलाल शेख याच्या घरी गेले असता त्यांना शेखलाल शेख व लखन शेख यांनी काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास स पो नि भोसले करीत आहेत