साखरवाडी(गणेश पवार)स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचे चिरंजीव सौरभ राजू शेट्टी विद्यार्थी परिषद प्रमुख यांचा दिनांक 18 रोजी फलटण तालुका दौरा झाला यावेळी सौरभ राजू शेट्टी यांनी महावितरणचे मुख्य अभियंता आवळेकर साहेब यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय फलटण येथे भेट घेतली व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या समस्या बाबत चर्चा केली तसेच शेती पंपाच्या डीपी चोरीबाबत व इतर मागण्याबाब सविस्तर चर्चा केली
फलटण तालुका महावितरण कार्यालया अंतर्गत येणाऱ्या ढवळ वाखरी येथील शेरेवाडी चिंतामणी डीपी नंबर दोन हा डीपी बसवल्यानंतर दोन तीन दिवसात जळतो अशा घटना तीन ते चार वेळा झालेल्या आहेत. आणि हा चिंतामणी डीपी चार वेळा चोरीला सुद्धा गेलेला आहे. अशा डीपी चोरीच्या घटना ज्या ज्या विभागात घडतात त्यासंबंधी आपण योग्य त्या उपाययोजना करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य ते न्याय द्यावा. वरील डीपीच्या तक्रारीप्रमाणेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटण महावितरण कडे मागण्या केल्या यामध्ये फलटण तालुक्यात जे नादुरुस्त डीपी आहेत ते त्वरित बदलून मिळावेत, डीपीच्या फ्युज बॉक्स व त्यांच्यातील फ्युज व्यवस्थित करून घ्याव्यात., शेतीतील व गावठाण हद्दीतील ज्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचे धोकादायक पोल आहेत ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करून घेण्यात यावेत,शेती पिकातील दोन्ही पोलमधील असणाऱ्या वायर काही ठिकाणी जमिनीपासून योग्य अंतरावर नाहीत त्या योग्य अंतरावर ताण देऊन वेळेत दुरुस्ती करून घ्याव्यात, शेती पंपाच्या डीपी व त्याच्या केबल ह्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने बदलून देण्यात याव्यात त्याचा भार शेतकऱ्यावर टाकू नये,शेतकऱ्याकडून ज्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी पैशाची मागणी करतात अशा कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वरील मागण्यावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वेळेत योग्य तो पर्याय काढावा अ शी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.
तसेच फलटण तालुक्यातील निरगुडी गावचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गोरख लालासो सस्ते यांच्या घरी भेट व कार्यकर्त्यांची विचारपूस केली. या दौर्याच्या वेळी फलटण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खालील पदाधिकारी उपस्थित होते.
धनंजय महामुलकर अध्यक्ष सातारा जिल्हा , नितीन यादव अध्यक्ष फलटण तालुका,डॉक्टर रवींद्र घाडगे, सचिन खानविलकर,प्रमोद गाडे राज्य प्रवक्ता यांची उपस्थिती होती