साखरवाडी (गणेश पवार)
फलटण बाजार समितीच्या निवडणुकांच्या आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 14 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात राहिले असून 81 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे . फलटण बाजार समितीसाठी एकूण 4 जागा बिनविरोध झाल्या असून त्यामध्ये कृषीपत व बहुउद्देशीय सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातुन शिंदे तुळशीराम (रा ठाकुरकी), हमाल, मापाडी मतदारसंघातुन निलेश कापसे (रा तांबमाळ), ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून गायकवाड अक्षय (रा कोळकी) व ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग मतदारसंघातुन संतोष जगताप (रा घाडगेमळा काळज) यांची बिनविरोध संचालक म्हणून बाजार समितीवर निवड झाली आहे.
निनिवडणूक होणाऱ्या उमेदवारांची यादी
कृषीपत व बहुउद्देशीय सहकारी संस्था सर्वसाधारण
सस्ते निशिगंध आत्माराम, पाटील शंभूराज विनायक, सरक खंडेराव पांडुरंग, लोखंडे शरद लक्ष्मण, नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथ राजे विक्रमसिंह, होळकर भगवान दादासो, शिंदे चेतन सुभाष, गावडे ज्ञानदेव बाळासो, गौंड दीपक विठोबा, माने विक्रम रामचंद्र, लोखंडे शंकर आत्माराम
कृषी पत व बहुउद्देशीय सहकारी संस्था
खताळ भीमराव पोपटराव, इवरे नानसो पोपट
कृषी पत व बहुउद्देशीय सहकारी संस्था महिला प्रतिनिधी
रणवरे सुनीता चंद्रकांत ,सस्ते जयश्री गणपत, कुल्लाळ शितल महादेव
ग्रामपंचायत सर्वसाधारण
झणझणे प्रदीप हरिभाऊ, शेवते काशिनाथ साधू, शिंदे किरण सयाजी, शिंदे रवींद्र आमराव, खरात चांगदेव कृष्णा
अनु ज्ञाप्ती धारक व्यापारी आडते
ननावरे बाळासाहेब दयाराम ,कदम संजय हरिभाऊ, जाधव समर दिलीप