Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोळकीत जुगार अड्ड्यावर छापा 11 जणांवर गुन्हा दाखल 2 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त crime

 





साखरवाडी गणेश पवार

कोळकी येथील जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात

एकूण 2 लाख 90 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अकरा जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 10 रोजी सायंकाळी ६ वाजता  कोळकी ता फलटण येथील हॉटेल संदीपा ढाब्याच्या पाठीमागे घरात काही लोक पत्यावर जुगार खेळत आहेत अशी बातमी शहर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी छापा टाकला असता बातमीच्या ठिकाणी बाहेरील बाजूस उभे असलेले काही व्यक्तीना पोलीसांची चाहूल लागताच त्याठिकाणावरून पळून गेले, एका रुममध्ये दोन लाकडी टेबलच्या समोर काही व्यक्ती गोलाकार पत्ते खेळत बसलेले दिसले. 


 सदर रूममध्ये गेलो असता दोन लाकडी टेबल व त्यांचे भोवताली काही इसम स्वतःचे अर्थिक फायदयाकरीता तेरा पानी पते घेवुन पैशांवर रमी जुगार खेळताना आढळून आले.  त्या रूममधील 10 व्यक्तींना प्रत्येकाला त्यांची नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपली नावे खालील प्रमाणे सांगुन त्यांचे ताब्यात खालील प्रमाणे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळुन आले. या कारवाईत एकूण 2 लाख 90 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


यावेळी योगेश संभाजी शिंदे यास सदरच्या खेळाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांने तो सदर जुगार अड्याचा मालक असून त्यांचा भागिदार माऊली भिवरकर (रा. भिवरकरवाडी ता. फलटण) असा असल्याचे सांगितले, तसेच आम्ही सदर जुगार खेळणा-या खेळींना भारतीय चलनी किंमतीच्या रक्कमे ऐवढे वेगवेगळ्या रंगाची प्लॅस्टीकची कॉईन देतो. सदरची प्लॅस्टीकची कॉईन हे भारतीय चलनाची प्रतीकृती म्हणून खेळी वापरतात. सदरच्या रमी खेळामध्ये जिंकणा-याला आम्ही त्यांने जेवढे कॉईन जिंकली असतील त्या रक्कमेच्या चलनी नोटा देत असतो याप्रमाणे आम्ही रमी जुगार खेळवत असून त्यातुन प्रत्येक टेबलच्या एका डावासाठी 100 रूपये आम्हाला जिंकणा-या खेळीकडून फायदा मिळतो असे सांगितले.


ऋषीकेष प्रल्हाद बोडरे (वय 23 वर्षे रा. आनंदनगर, खुंटे ता फलटण) माऊली भिवरकर (रा. भिवरकरवाडी ता. फलटण) हा बेकायदेशीररीत्या आर्थिक फायदयाकरीता रमी जुगार हा पैशांवर खेळवून जुगाचारा अड्डा चालवित असून योगेश संभाजी शिंदे (वय 43 वर्षे रा अलगुडेवाडी ता. फलटण), बाळु ईश्वर माळी (वय 50 वर्षे रा.मलटण फलटण), सोनु सोमनाथ घनवट (वय 39 वर्षे रा जाधववाडी ता फलटण), विनायक लालासो चव्हाण (वय 49 वर्षे रा. सस्तेवाडी ता फलटण), धिरज अमोल लगाडे (वय 19 वर्षे रा. मलटण फलटण), रोहन दिलीप माने (वय 33 वर्षे रा शुक्रवार पेठ फलटण), सुनिल मोतीराम पवार (वय 40 वर्षे, रा बुधवार पेठ फलटण), सुनिल रामदास साळुंखे (वय 38 वर्षे रा पाचबती चौक फलटण), महेश अशोक जाधव (वय 34 वर्षे, रा. जाधववाडी ता. फलटण) यांनी बेकायदेशीरपणे स्वताच्या अर्थिक फायदयाकरीता पैशांवर रमी जुगार खेळत होते. याप्रकरणी पो.कॉ काकासो कुंडलिक कर्णे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.