साखरवाडी गणेश पवार
ढवळ तालुका फलटण येथून दिनांक 28 मार्च रोजी कॉलेजला जाते असे सांगून दोन युवती बेपत्ता झाल्याची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात संजय सोपान जाधव रा ढवळ ता फलटण यांनी फिर्याद दिली असून तिथून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी यांची मुलगी सुरेखा संजय जाधव (वय 19) व पुतणी गौरी अंकुश जाधव (वय 19) या दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजता घरून कॉलेजला जातो असे सांगून गेल्या असून त्या परत माघारी आल्या नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत करीत आहेत